महाराष्ट्र

करमाळा शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना पाठिंबा व मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा विधानसभेचे महाविकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील यांना मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार करमाळा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष माननीय उस्मान शेठ तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये एकमताने ठराव घेण्यात आला

तर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी करमाळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करमाळा शहर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने माजी आमदार पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी साठी मुस्लिम समाजाने आता कंबर कसली असून उमेदवार माजी आमदार पाटील यांना करमाळा शहर व तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य कसे पडतील या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज अहोरात्र परिश्रम घेऊन माजी आमदार पाटील यांना निवडून आणण्यासाठी एक नियोजित कार्यक्रम घेणार असल्याची माहिती मुस्लिम समाज नेते तांबोळी यांनी बोलताना दिली

याचवेळी करमाळा शहर तसेच परिसरातील कंदर, केम, आवाटी, सालसी, उमरड, सावडी, जेऊर कुंभारगाव टाकळी पारेवाडी जिंती या सह तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांना सकल मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपला पाठिंबा दर्शविला यावेळी करमाळा शहर तसेच परिसरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम श्री कमलादेवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी यांच्या फार्म हाऊस वर पार पडला

यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील बोलताना म्हणाली की मी मुस्लिम समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडवणे व या समाजाला विकासाच्या वाटेवर आण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाठिंबा दिला यामुळे त्यांचा मी ऋणी व आभारी आहे भविष्यात मी मुस्लिम समाजाचे कोणतेही कामे असू दे मी माझ्या प्रयत्नाने ती पूर्ण करेल असे अभिवचन श्री पाटील यांनी बोलताना दिले. मुस्लिम समाजाने माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने निश्चितच नारायण पा पाटील यांच्या मतात वाढ झाली आहे

यावेळी कंदर चे सरपंच मौलाभाई,
इर्शाद जहागीरदार, व त्यांचे सहकारी टाकळी खातगाव जींती सावडी कोर्टाी विहाळ पत्रा बस्ती मोरवड जेउर उम्रड केम कंदर वांगी साडे आवाटी व शहरातुन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नगर सेवक अल्ताफशेठ यांनी प्रास्तवीक केले व उस्मानशेठ यांनी नारायण आबां चा सत्कार करुन पाठींबा जाहीर केला

यावेळी अमिरसेट तांबोळी,आतीक बेग ,इंदाज वस्ताद, बीके, वाजीद शेख ,बब्बु बेग, तोफीक शेख, शाहरुख मुस्तकीम पठान अफरोज समीर शेख अमीन बेग राजु तांबोळी लियाकत रसुल भाई इनुस हुसेन पठान इनुस भाई सादिकभाई मोहसीन मौलाना iपहिलवान इमदाद शेटे उस्मान कुरेशी मुन्ना पठान अली पठान अरशान पठान बंडु शेख साहिल वस्ताद शाबीर तांबोळी इनुस भाई रशीदभाई आदी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button