राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्रा.डॉ.सुनिल लोखंडे यांना माळशिरस विधानसभा मतदार संघात प्रचंड प्रतिसाद…
प्रतिनिधी महेश मोहिते
राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार प्रा.डॉ.सुनिल लोखंडे यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघात गावोगावी जाऊन मतदारांचा कौल घेतला तेंव्हा उत्स्फूर्तपणे लोकांनी प्रतिसाद दिला एक उच्चशिक्षित स्वच्छ चारित्र्याचा दूरदृष्टीचा उमेदवार जर तालुक्याला मिळाला तर चांगलेच होईल असे सांगून आम्ही जरूर तुमच्यासाठी मदत करू असे आश्वासित केले
तुमचा नम्रस्वभाव व सर्वांचं ऐकून घेण्याची मानसिकता आम्हाला आवडली कोणी कोणाकडे ही जावो मध्यमवर्ग व सुशिक्षित तरुण वर्ग नक्की तुमच्या बरोबर राहील असा आशावाद व्यक्त केला जेथे जेथे गावात ते गेले तेथे महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले तेंव्हा सरानी नम्रपणे त्यांचा आशीर्वाद घेतला एका गावात तर स्पीकर व माईक ची सोय करून छोटेखानी सभेचीच तयारी केली होती
तेथील प्रतिष्ठित गावकरी ही उपस्थित होते तेंव्हा त्यांनी ही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तेथे बोलताना लोखंडे सरांनी सांगितलेकी मला अजून चिन्ह मिळायचे आहे मी फक्त आपणास दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे आजून प्रचाराला वेळ आहे आणि कितीही प्रचार केला गाड्या फिरवल्या काही देतो म्हणून सांगितलं तरी मतदाराने जे मनात ठरवले आहे तेच तो करतो त्यामुळे उमेदवार निवडताना आपला उमेदवार आपले विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहे
त्यामुळे तो कसा असावा हे आपण ठरवावे त्याचबरोबर आपलं मत म्हणजे काय सांगून मतदान का केलं पाहिजे याविषयी सांगितले तेंव्हा आपला प्रतिनिधी सरांसारखाच असावा अशी कुजबुज ऐकायला मिळत होती….सरांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे तरुण मध्यमवयीन होतेच परंतु त्यांच्याबरोबर 74 वर्षाचे एक आजोबा तरुणाला लाजवेल अशा ऊर्जेने सहभागी होते आणि सक्षमपणे भूमिका मांडत होते तेंव्हा ऐकणारे शांतपणे ऐकत होते