नाराज झालेल्या भरत शहांच्या भेटीला पोहोचले खुद्द शरद पवार. हरषवर्धन पाटील यांच्या उमेवारीने होते नाराज
इंदापूर प्रतिनिधी समिर शेख टाईम्स 9 मराठी न्यूज
मो 9766863786
शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते मंडळींनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवाराला विरोध केला आणि तिसरी आघाडी तयार करण्यात आली. प्रवीण माने यांनी पक्षातून बंडखोरी झाली
निवडणुकीच्या रणधुमाळीत आता गाठीभेटींना वेग आला आहे. नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज शरद पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानसभेचे देखील तिकीट देण्यात आलं. त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षातील काही नेते मंडळींनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवाराला विरोध केला आणि तिसरी आघाडी तयार करण्यात आली. प्रवीण माने यांनी पक्षातून बंडखोरी झाली.
या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार इंदापूर तालुक्यातील चार कुटुंबाची भेट घेणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला इंदापूरच्या भरत शहा कुटुंबियांनी विरोध केला होता. त्यांच्या घरी जाऊन शरद पवार कशी त्यांची नाराजी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शहा कुटुंबाच्या भेटीला गेले आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शहा कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
भरत शहा हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. शरद पवारांसोबत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि चिरंजीव राजवर्धन पाटील देखील उपस्थित आहेत. भरत शहा बंधू मुकुंद शहा आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे