शहर

भरधाव कार चालवून अपघात करणाऱ्या चालकावर सफाळे पोलिसांनी केला गुन्हा दाखल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक:7030516640

सफाळे येथे एका सुसाट वेगवान मारुती कारच्या वाहन चालकांनी दुचाकी स्वाराला समोरून ठोकर दिल्यामुळे हा दुचाकी स्वार जबरी जखमी झाला आहे.
त्याला पुढील उपचारासाठी विरार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून कार चालकाला सफाळे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर रविवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे.

रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सफाळे येथील चौधरी नावाचा दुचाकीस्वार सफाळे स्टेशन येथून कर्दल कडे जात असताना पालघर वरून सफाळे स्टेशन कडे विरुद्ध बाजूने केळवा येथील नंदन वर्तक ( 40) हा इसम भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने MH 03HG 8911 ही राखाडी रंगाची मारुती कार घेऊन जात असताना सफाळे सहजा फर्निचर जवळ या दोघांचा अपघात झाल्यामुळे मोटर सायकल स्वार चौधरी यांच्या डोक्याला नाकाला व हाता पायाला जबरी जखम झाली असून त्याला पुढील उपचारासाठी विरार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून या अपघातामुळे बाजूला उभ्या असलेल्या तीन खाजगी मॅजिक वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.याबाबत सफाळे पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button