महाराष्ट्र

महायुती विधानसभा समन्वयक पदी हिवरकर पाटील यांची निवड

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73

नुकतीच मुंबई येथून महायुती सरकारने महाराष्ट्रामधील प्रत्येक मतदारसंघाच्या समन्वयक पदी शिवसेना भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून तालुका स्तरावर प्रत्येकी एक अशी समन्वयकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली

या यादीमध्ये माळशिरस विधानसभेसाठी शिवसेनेकडून लोकप्रिय असलेले राजकुमार हिवरकर पाटील यांची निवड करण्यात आली हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुक्यामध्ये आजपर्यंत केलेले काम यावरूनच महायुती सरकारकडून माळशिरस विधानसभेच्या समन्वयक पदी त्यांची निवड करण्यात आली

तसेच भाजपाकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य केके पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने रमेश पाटील यांची निवड करण्यात आली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यामध्ये 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुक्यामध्ये शेकडो अशी आरोग्य संबंधित वेगवेगळ्या तपासण्यांची शिबिरे तसेच गोरगरीब माता-भगिनींसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन तसेच दिवाळीमध्ये माळशिरस तालुक्यामधील नागरिकांना सवलतीच्या दरात हरबरा डाळीचे वाटप तसेच श्रीपुर महाळुंग नगरपंचायत व नातेपुते नगरपंचायत मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या समावेशना बाबतचा विशेष प्रयत्न तसेच तालुक्यातील नगरपंचायत मधील शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी केलेले योगदान तसेच माळशिरस तालुक्यामध्ये शासकीय बचत गटातील महिलांना रेशन दुकान उपलब्ध करून दिले यामध्ये विशेष करून 27 गावांमधील 21 रेशन दुकाने नव्याने बचत गटातील महिलांना उपलब्ध करून दिली

शाळेतील मुलींना रोड रोमिओ पासून होणाऱ्या त्रासाबद्दल वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य तो कारवाई करण्याचे नेहमी आदेश दिले आहेत याच कामाची दखल घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांनी माळशिरस तालुक्याच्या समन्वयक पदी श्री राजकुमार हिवरकर पाटील यांची नियुक्ती केली यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये इतरत्र जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button