महाराष्ट्र

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कै. सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलास वासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेता त्यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथे मराठा मित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला

सदरचा कार्यक्रम करमाळा पुणे मार्गावरील यश कल्याणी सेवा भवन या हॉलमध्ये नुकताच पार पडला यशकल्याणी सेवाभवन मध्ये मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळ्याचे सदस्य सोहळ्याला उपकार्यकारी अभियंता ( पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सोलापूर ) आणि मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य मनोज राऊत साहेब, उत्तम माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील , माजी नगरसेवक व समाज सेवक श्रेणिक शेठ खाटेर, किरण घाडगे, बहुजन चळवळीचे नेतृत्व दशरथ आण्णा कांबळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवश्री जमीर भाई सय्यद यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची प्रशंसा करत मान्यवरांनी हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी काम करण्याची अत्यंत आवश्यक असुन सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन बहुजन चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाज घटकांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून यापुढेही आपले सामाजिक कार्य चालू राहील असे शिवश्री जमीर भाई सय्यद यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुस्लीम समाजातील युवकांना सोबत घेऊन मुस्लीम समाजाला इतर समाजा बरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.

त्यांना मिळाल्या पुरस्काराबद्दल मुस्लीम समाजातील मार्गदर्शक विचारवंत मा हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, माजी संचालक फारुख जमादार,माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी , डॉ समीर बागवान, एड अलीम पठाण, एड न ईम काझी, सर्कल भाऊसाहेब युसुफ बागवान, सर्कल सादिक काझी, सामाजिक कार्यकर्ते अय्युब शेख, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार अलीम शेख, अल्पसंख्याक कर्मचारी संघटना व अनेक मुस्लीम समाजातील युवक व ज्येष्ठांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button