महाराष्ट्र

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब असल्याने मतदार आता सेवेत बदल करणार असून नारायण (आबा) पाटील यांना संधी देणार असा आत्मविश्वास प्रवक्ते सुनील तळेकर व्यक्त केला. काल विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारी बाबत बोलताना त्यांनी सांगितले कि महाविकास आघाडी मार्फत अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील हे निवडणूक रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा बी फॉर्म हा नारायण (आबा) पाटील यांनाच मिळणार असल्याने तुतारी घेतलेला माणूस हेच पाटील यांचे निवडणुकीतील चिन्ह असेल. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी गावभेट दौरा करून करमाळा मतदार संघ पिंजून काढला आहे. करमाळा तालुक्यात मतदारांचा एक सर्वाधिक मोठा जनाधार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी आहेच पण या मतदार संघास जोडलेल्या माढा मतदार संघातील कुर्डुवाडी सह छत्तीस गावातही माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वागत मतदारांनी मोठ्या उत्साहात केले आहे.

या गावभेट दोऱ्यात सभेस मोठ्या प्रमाणात मतदार जमत होते. विशेष म्हणजे या छत्तीस गावातील मतदार हा विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज असून तो आता आमदार शिंदे यांच्या विरोधात बोलू लागल्याचे बहुतांश गावातून आम्हाला दिसून आले. यामुळे संपूर्ण करमाळा मतदार संघ हा विद्यमान आमदार यांच्या निष्क्रियते बाबत मनात राग ठेवून असून सतत संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या विद्यमान आमदारांना घरी पाठवून आता सत्तेत बदल करण्याच्या मनस्थिती मध्ये आहे. यामुळे जनतेनेच आजपासून ही निवडणूक हाती घेतली असल्याने नारायण (आबा) पाटील हे आमदार होणार हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व पदाधिकारी हे आमच्यासाठी सन्माननीय असून या सर्वांची माजी आमदार नारायण आबा पाटील यांना भक्कम साथ आहे.

निवडणुकी साठी कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी सज्ज असून माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाची आमची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा व महाविकास आघाडीचा एकत्रीत जाहीरनामा हा या मतदार संघातील जनतेच्या विकासाच्या मुद्द्याना प्राधान्य देणारा असणार आहे.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे आशीर्वाद माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पाठीशी असल्याने मतदारांचा कल हा लोकसभे प्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही तुतारी वाजवण्याच्या बाजूने आहे. यामुळे आता माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या विजयासाठी प्रत्यक्ष मतदार राजाच्या जास्तीत जास्त संपर्कात येऊन मतदानाची टक्केवारी वाढवून माजी आमदार नारायण आबा पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील असेही प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button