महाराष्ट्र

बिगुल वाजला! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, निकाल ‘या’ तारखेला

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर आज (15 ऑक्टोबर) वाजला. केंद्रीय निवडणूक आयोग राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम जाहीर केला.

20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे.

  • अधिसूचना जारी होण्याची तारीख- २२ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- २९ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज छाननीचा दिवस- ३० ऑक्टोबर २०२४
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ०४ नोव्हेंबर २०२४
  • मतदानाचा दिवस- २० नोव्हेंबर २०२४

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई

या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान पार पडेल.
यानंतर अवघ्या देशाचं लक्ष हे मतमोजणीच्या म्हणजेच निकालाच्या तारखेकडे असणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 रोजी (शनिवार) जाहीर होईल. याच दिवशी हे चित्र स्पष्ट होईल की, राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार. सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार अस्तित्वात आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता यंदा कोणाच्या हातात सत्ता देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभेचा कालावधी हा 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन विधानसभा निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे मुख्य आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार) रोजी जाहीर केला जाईल. या दिवशी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button