पश्चिम रेल्वेच्या डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेकडून चारही डहाणू लोकलचे व मोटरमनचे केले स्वागत

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भमणध्वनी क्रमांक -7030516640
दसऱ्याचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेने मागील प्रदीर्घ अशा साडेतीन वर्षापासून बंद केलेली डहाणू येथून सकाळी 7:05 ची विरार लोकल 7:00 अशी वेळ बदलून पुन्हा सुरू केली तसेच विरार येथून सकाळी 9:30 ला अतिरिक्त फेरी सुरू करण्यात आली जी सौराष्ट्र एक्सप्रेसची वेळ कव्हर करेल
अशा प्रकारे शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 पासून डहाणू लोकलच्या 2 अप 2 डाऊन अशा फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
या चारही फेऱ्या साठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मागणी केली होती आणि ती पूर्ण केल्याच्या आनंदाने संस्थेच्या माध्यमातून 4:50,7:00, 9:30 आणि 10:25 च्या लोकलचे व मोटरमन पुष्पगुच्छ आणि श्रीफळ ,फुलांचे रोपटे,टि-कप आणि स्विट देऊन वैतरणा,सफाळे, केळवे रोड आणि उमरोळी येथे स्वागत करण्यात आले.
ह्या समारंभा प्रसंगी वैतरणा येथे सतिश गावड, सखाराम पाटील, लक्ष्मण वैती, गिरीधर टोकरे तसेच DVPSS वैतरणा स्टेशन कमिटीचे सदस्य,केळवे रोड येथे संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार,सचिव दयानंद पाटील ,अमेय सावे आणि संजय पाटील, तर उमरोळी येथे महेश पाटील ,सरपंच प्रभाकर पाटील आणि नितीन वझे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे केळवे रोड येथे 9:30 च्या लोकलचे आणि मोटरमन गणपत सावंत ह्यांचे स्वागत शाळेय छोट्या विद्यार्थी मंडळी युवराज पवार, स्वनित गावड, हंसराज पाटील ह्यांच्या हस्ते गुलाबफुलाचे गुच्छ, स्विट व टि-कप देऊन करण्यात आले .

पश्चिम रेल्वेने प्रदिर्घ अशा सहा वर्षाच्या कालखंडानंतर डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविल्याने प्रवाशांमध्ये उत्साही वातावरण असून आनंद व्यक्त होत आहे. पच्छिम रेल्वेस एक कळकळीची विनंती आहे कि ह्यापुढे लोकलच्या फेऱ्या वाढवायचे झाल्यास कुठलीतरी आधीची फेरी रद्द करून दुसरी फेरी सुरू करतात तसे न करतात वाढीव फेरी ही अतिरिक्तच असावी. संस्थेच्या मागण्यांना योग्य स्थान दिल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद.
- नागदेव पवार, अध्यक्ष-डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था



