महाराष्ट्र

आ.बबनराव शिंदेंना परत पक्षात घेऊन मा.शरद पवार स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतील का ?

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महायुतीसोबत असलेले व अजित पवार गटातील सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे हे पुन्हा शरद पवारांच्याकडे येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुक वेळेस तुतारी चिन्हावर त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उभा करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र शरद पवार यांना सोलापूर जिल्ह्यात आ.बबनराव शिंदे यांना सोबत घेऊन फायदा होण्यापेक्षा तोट्याचीच गणिते अधिक दिसत आहेत..

सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांनी निमगावचे शिंदे ब्रदर्स यांना हाताशी धरून मोहिते-पाटील यांना कोंडीत गाठण्याचा प्रयत्न केला याच राजकारणाला गुडबाय करत मोहिते-पाटील यांनी भाजपची वाट धरली व भाजपला जिल्हा परिषद, नगरपालिका, माढा लोकसभा ,विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवले.पुढे राज्यात देखील अनेक समीकरणे घडली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पार्ट्या झाल्या सत्ताबदल झाला. शरद पवार यांच्या पक्षाला ग्रहण लागले
वारा सत्तेच्या दिशेला वाहत असतना देखील विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यात शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले सोलापूर आणि राज्याची दिशा बदली पश्चिम महाराष्ट्रातील जुना वसंतदादा गट काँग्रेसपेक्षा पुन्हा शरद पवार यांच्या जवळ येऊ लागला आहे..

आता कुठे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पक्षाला नवी उभारी मिळू लागली असतना दुधात मिठाचा खडा पडून संपूर्ण दूधच नसणार हे घडू नये असे पवार प्रेमी लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत,त्याला कारणही तसेच आहे.पवार साहेबां सोबत गद्दारी करणारे माढ्याचे शिंदे बंधू यांना पक्षात स्थान देणे म्हणजे थेट विजयसिंह मोहिते-पाटील यांना दुखावणे.. विधानसभेची एक जागा पाहून विजयदादांना दुखावणे हे पवार साहेबांच्या पक्षाच्या राजकारणसाठी भविष्यकाळासाठी हितकारक नाही. सोलापूर, सातारा जिल्ह्य़ातील विधानसभा,जिल्हा परिषद,महानगरपालिका,चार लोकसभा, यावर थेट परीणाम होऊ शकतो हे नव्याने याच विश्लेषण करण्याची गरज नाही..

आता राहीला माढा विधानसभा मतदारसंघातील आ.बबनराव शिंदे यांना पवार यांना पक्षात घेऊन काय फायदा होऊ शकतो? तर स्वतःच्या मतदारसंघात देखील ते निवडून येण्याची गॅरंटी नाहीय एका बाजूला मराठा समाजाचा रोष ,शेतकऱ्यांच्या नावावर काढलेली कर्ज प्रकरणे, मोहिते-पाटलांसहीत स्थानिक अभिजित पाटील,पवार गटातील पदाधिकारी यांच बरोबर तानाजी सावंत व शिवाजी सावंत या बंधूचा देखील विरोध..

फायद्यापेक्षा तोटेचे अधिक असताना शिंदे यांना पवार गटात प्रवेश देऊन काय साध्य करायचे आहे असा प्रश्न देखील पदाधिकारी यांच्याकडे उपस्थित केला जात आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करण्याचे कामा प्रदेशाध्यक्ष म्हणून आ.जयंत पाटलांनी करायला हवे अन्यथा पुन्हा येरे माझ्या मागल्या हे आहेच..

तूर्तास इतकेच

©️महेश पाटील,
पंढरपुर, माढा विधानसभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button