स्वप्नाच्या दिशेने पहिलं पाऊल…। दखनेतील पहिले अल्पसंख्यांकांच्या हक्काचं विद्यापीठ एएमयू सोलापूर
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा विचार करुन परिवर्तनाच्या उद्देशानेच सोलापूर शहरानजीक आम्ही १०२ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीनीच्या खरेदीची कायदेशीर प्रक्रीया मागील दोन वर्षे सुरु होती. ही कायदेशीर प्रक्रीया पार पडल्यानंतर आम्ही या जमीनीवर शैक्षणिक प्रकल्पाच्या उभारणीकडे पाऊल टाकत आहोत.
३ नोव्हेंबरला या जमीनीवर ‘एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटी’ या दखनेतील पहिल्या अल्पसंख्यांक विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ आयोजित केला आहे. या समारंभासाठी अलीगड मुस्लिम विद्यापीठ, जामिआ मिल्लीआ विद्यापीठ, मौलाना आझाद विद्यापीठ, जोधपूर, सायन्सन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, मेघालय, मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ, हैदराबाद या विद्यापीठांचे प्रमुख आणि कुलगुरु व माजी कुलगुरु उपस्थित राहणार आहेत. सदरचे पायाभरणी समारंभ ज्येष्ठ इस्लामी विचारवंत व अभ्यासक मा. सज्जाद नोमानी यांच्या हस्ते होईल. यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मा. उमरैन महफूज रहेमानी हे उपस्थित राहतील.
या सोहळ्यानंतर सोलापूर शहरात सकाळी १० वाजता ‘अल्पसंख्यांक शैक्षणिक समन्वय परिषद, सोलापूर -२०२४’ ला सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, काँग्रेस नेते राज बब्बर, खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होईल. (उदघाटनाचा सोहळा फक्त २० मिनिटे असेल.) या परिषेदसाठी मा. फेरोज बख्त (माजी कुलगुरु, मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ, हैदराबाद), मा. जफर सरेशवाला, (माजी कुलगुरु, मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ, हैदराबाद), मा. हुझैफा वस्तानवी (गुलाम वस्तानवी विद्यापीठ अक्कलकुवाचे प्रमुख), मा. मुनव्वर जमा, मा. समीर सिद्दीकी, अलीगड विद्यापीठाचे प्रा. मोहीबुल हक, मा. अय्याज शेख, मा. डॉ. इस्माईल शेख यांच्यासह देशभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक विकास व उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. समाजाच्या स्थितीत बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण आमच्या या प्रयत्नांचा भाग होऊ शकता.