महाराष्ट्र

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा माढा तालुका दौरा…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

काल माढा तालुक्यातील मौजे खैराव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनसंपर्क दौरा संपन्न झाला.सर्व प्रथम खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान केल्याबद्दल तमाम जनतेचे आभार व्यक्त केले,या वेळी भावी आमदार शिवतेजसिंह मोहिते पाटील आवर्जुन उपस्थित होते…

माढा मतदारसंघातील तरुणांमध्ये रोजगाराच्या संधींचा अभाव आहे.उद्योग आणि व्यापाराच्या संधी निर्माण करण्यात सहा टर्मचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याची जनतेमध्ये भावना आहे.येत्या विधानसभेला निश्चितच परिवर्तन घडेल व माढा तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा महाविकास आघाडीचाच असेल यात शंका असण्याचे कारण नाही असे हि खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले…

यावेळेस शिवाजी नाना कांबळे,दादासाहेब साठे,भारत पाटील,संजय घाटणेकर,बाळासाहेब पाटील,ज्योतीताई कुलकर्णी,विलास बप्पा देशमुख,जनाबाई मस्के, बाळासाहेब पाटील,कुलदीप नागटिळक,समाधान नागटिळक,धनाजी शेळके,इतर मान्यवर उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button