शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसर आदिवासी हक्क अधिकार संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

सफाळे परिसर आदिवासी हक्क अधिकार संघर्ष समिती आणि आदिवासी समाजोन्नती संघ यांच्या संयुक्त पणे सोमवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी शिल्टे,सफाळे, माकणे, कपासे, जळसार, एडवण येथील आदिवासी ग्रामस्थांचा विविध मागण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढण्यात आला होता.

पालघर चार रस्ता येथे बिरसा मुंडा चौकाला अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. यावेळी जिल्हाधिकारी कर्यालयाच्या गेटवर मोर्चेकरी जमा होऊन या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शिल्टे, सफाळे, माकणे, कपासे, जळसार, एडवण येथील ग्रामस्थानी विविध भागातून समस्या मांडल्या.मोर्चात युवावर्गासह, महिला, आणि ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग नोंदवला. दुपारच्या कडक उन्हामध्येही न डगमगता मोर्चेकरी ठाम राहून त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पालघर जिल्हाधिकारी यांना दिले.

यावेळी या मोर्चात ग्रामपंचायत सफाळे नंदाडे-उंबरपाडा, माकणे, कपासे ह्या ग्रामपंचायतींना पेसा अधिकार क्षेत्रातून वगळण्याचे षडयंत्र थांबवून पेसा क्षेत्राचे हक्क अबाधित ठेवणे, ग्रामपंचायत शिलटेच्या आदिवासी उपयोजनेत घेऊन पेसा ग्रामपंचायतीचा दर्जा लागू करणे, पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासकीय आदिवासी समुहाची जमाती निहाय जनगणना करण्यात यावी जलसार येथे अनधिकृतपणे झालेल्या उत्खननाच्या विरोधात प्रशासकिय करीत असलेल्या मनमानी कारभारा विरोधात करवाई करणे आदि मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सागर सुतार (अध्यक्ष),किशोर गिराणे, सूरज काठे, उदय भुयाळ, कल्पेश भुयाळ, गणेश बोंबाडे, महेंद्र सुतार, मनोज भोईर, आशुतोष बरफ, विशाल कोम, रुपेश धांगडा, सुरेश भोईर, पिंट्या मानकर, विश्वनाथ मालकरी, संतोष बोंबाडी, नथू पिलेना, प्रशिल वरठा, रक्षित पवार, अविनाश भोईर, अनिल, ,शिल्पा म्हस्कर, कलावती जाधव, मनोज भोईर, विजय शेलका यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button