आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणी ग्रामपंचायत शिपाई यांचा सन्मान व साडी वाटप
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त संगम गावातील अंगणवाडी सेविका आणी मदनीस तसेच आरोग्य सेविका यांचा मानसन्मान करून त्यांना साडी वाटप ग्रामपंचायत सदस्या जयश्री इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .
ग्रामपंचायत मधील ऑपरेटर आणी शिपाई यांचाही मान सन्मान करून कपडे वाटप करण्यात आले .यावेळी बोलताना गणेश इंगळे म्हणाले की या मानसन्मानाच्या मागचा एकच हेतू की महाराष्ट्र शासनाचे कोणतेही उपक्रम असतील ते जनते पर्यंत पोहचवण्याचे किंवा राबवण्याचे काम हे अहोरात्र पणे घरोघरी जाऊन भगिनींना करावे लागते पण त्यांचा मानसन्मान कधीच कोणीही करत नाही हे लक्षात घेता त्यांचा मान सन्मान घेण्याचे ठरवले आणी संगम ग्रामपंचायत येथे तो घेण्यात आला .
या भगिनींचा मान सन्मान केल्या नंतर जो त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद होता तो वाखण्या जोगा होता यावेळी सुवर्णा गवळी काविरा झेंडे सोनाली महाडिक आश्विनी सरतापे सुशिला गवळी मनिषा मोरे शिवाली भोसले निलम लावंड अनुराधा बोडरे महेश जाधव यांचा मान सन्मान करण्यात आला.यावेळी बाळासाहेब भोसले रणजित इंगळे बाबासाहेब महाडिक आदित्य इंगळे निता इंगळे प्रतीक्षा इंगळे उपस्थित होते.