महाराष्ट्र

केंद्रपुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय योगदानाबाबत पत्रकार “गोपाळ लावंड” यांचे पत्राद्वारे अभिनंदन

प्रतिनिधी- रियाज मुलाणी
मो.9921500780

माळीनगर जि. सोलापूर येथील दैनिक पुढारीचे”पत्रकार-गोपाळ लावंड “यांनी केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करून योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासन साक्षरता अभियान प्राधिकरण तथा शिक्षण संचनालय योजना महाराष्ट्र राज्य 17 डॉ.आंबेडकर मार्ग पुणे यांच्या वतीने शिक्षण संचनालय चे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दैनिक पुढारीचे माळीनगर प्रतिनिधी, पत्रकार गोपाळ लावंड यांना अभिनंदनाचे पत्र पाठवून कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की

केंद्रपुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम महाराष्ट्र राज्याने दि. 14 ऑक्टोबर, 2022 च्या शासन निर्णयाद्वारे स्वीकारला आहे. सदर कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीत राबविला जात आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार, राज्यात 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील 1 कोटी 63 लक्ष व्यक्ती असाक्षर आहेत. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचेकडून महाराष्ट्र राज्याला सन 2022 ते 2025 अखेर 12,40,000 इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी दि. 9 ऑक्टोबर, 2024 अखेर 9,17,677 इतक्या असाक्षरांची उल्लास अॅपवर नोंदणी झाली आहे. मागील वर्षी दि. 17 मार्च, 2024 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेत 4,25,906 इतके असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत.

जनभागिदारी (लोकसहभाग) हे या योजनेचे एक वैशिष्ट्य आहे. असाक्षरता ही केवळ शैक्षणिक समस्या नसून ती एक

गंभीर सामाजिक समस्याही आहे. त्यामुळे या कार्यक्रमास लोकचळवळीचे स्वरुप द्यावे लागेल, उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. सदर कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वर्तमानपत्राच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करुन सदर कार्यक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहात. सदरच्या योगदानासाठी आपले हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद….!

केंद्र शासनाच्या ‘जन जन साक्षर’ आणि राज्य शासनाच्या ‘साक्षरतेकडून समृद्धीकडे’ या घोषवाक्यानुसार वाटचाल करताना भविष्यातही या कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी आपले सहकार्य मिळेल असा विश्वास आहे.

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे -1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button