महाराष्ट्र

मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला नाही तर आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशाराराज्यातील मुद्रांक विक्रीही बंद करणार

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल - 8378081147

मुद्रांक विक्रीची मनौती पाच टक्के, सेवाशुल्क २० रूपये मिळावे. मयत मुद्रांक विक्रेत्यांचे कुटुंबातील व्यक्तीस वारसाहकाने परवाना मिळावा. शासकीय जागेत व न्यायालयाचे आवारात बसण्याची परवानगी द्यावी अशा मागण्यांचा विचार केला नाही तर मुद्रांक विक्री बंद करून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा नोंदणी महानिरीक्षकाना मुद्रांक विक्रेत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक यांचा धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले. त्यामध्ये मुद्रांक विक्रेत्यांना अल्प प्रमाणात मनौती मिळते त्यात उदरनिर्वाह चालविणे वाढत्या महागाईमुळे अशक्य आहे. तरी मनौती ५% करण्यात यावी व प्रति मुद्रांक विक्रीमागे २० रु. सेवाशुल्क मिळावे. राज्यात सुरु असलेली ई-चलान तसेच ई-एसबीटीआर ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक याचे मार्फतच राबविण्यात यावी. त्यासाठी कमीत कमी सेवा शुल्क रु. १०० आकारण्याची परवानगी मिळावी. शासनाच्या अधिकृत सेवा पुरविणे ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी. मयत मुद्रांक विक्रेत्यांचे कुटुंबातील व्यक्तीस वारसाहकाने परवाना मिळावा. मुद्रांक विक्रेत्यांना ५०० रु. वरील सर्व प्रकारचे स्टॅम्प उपलब्ध करुन द्यावेत. मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय जागेत व न्यायालयाचे आवारात बसण्याची परवानगी द्यावी. महाराष्ट्रातील ट्रेझरीमध्ये हजारो करोडोंचे स्टॅम्पपेपर पडून आहेत ते मुद्रांक विक्रेत्यांना विक्री करीता उपलब्ध करून द्यावेत. मागील महिन्यात शासनाने ३० हजार रुपये स्टॅम्प ड्यूटीची मर्यादा १० हजारावर आणली. पुन्हा ३० हजारावर पुर्ववत करण्यात यावी. प्रत्येक मुद्रांक विक्रेत्याला मदतनीस ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संपूर्ण महाराष्ट्रातील स्टॅम्प विक्री बंद करून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राज्याचे नोंदणी महानिरिक्षक हिरालालजी सोनवणे यांना दिलेल्या मागण्यांचे निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत नोंदणी महानिरीक्षकांनी सांगितले, तुम्हास सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढू अशी सकारात्मक चर्चा झाली. सदर प्रसंगी दिलीप देवरे, राहूल नाईक, नितीन गांधी, संगिता लोखंडे, मुकुंद भुतडा, तनवीर लियाकत खान आदी मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button