संपादकीय

माढा लोकसभा संदर्भात अकलूज येथे होणाऱ्या मोहिते पाटील गटाच्या बैठकीकडे लागले संपूर्ण राज्याचे लक्ष

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

भाजपाने माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपा पासून दुरावलेला असंतुष्ट गट व त्यांच्या पदाधिकाऱ्याची बैठक अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली आज संपन्न होत असून माढा लोकसभेचे किंग मेकर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे मात्र संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार नारायण आबा पाटील, फलटणचे रामराजे निंबाळकर त्यांचे सुपुत्र संजय निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न निवासस्थानी अंतर्गत बैठक चालू असून याबाबत मोहिते पाटील गट कोणता निर्णय घेणार हे आज स्पष्ट होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहेमाढा लोकसभेचा उमेदवारीचा अंतर्गत तिढा सुटलेला नसून माढा लोकसभा साठी भारतीय जनता पार्टीने पुनश्च एकदा खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देऊन मोहिते पाटील गटाला एक प्रकारे आवाहन दिले आहे माढा लोकसभेसाठी तरुण युवा अभ्यासू उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी द्यावी यासाठी गेली कित्येक महिन्यापासून मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते आग्रही होते मात्र मोहिते पाटील यांना डावलून भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी पुनश्च एकदा खासदार रणजीत निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने माढा लोकसभेत आता काय होणार याकडे राज्याचे लक्ष वेधले आहेमाढा लोकसभेसाठी कोणता निर्णय घ्यावा यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर भाजपा असंतुष्ट गटाची बैठक बोलवण्यात आली असून यामध्ये कोणता निर्णय होणार हे संध्याकाळी सात वाजेपर्यंत समजणार असून मोहिते पाटील गटाच्या या निर्णयाकडे मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button