लोकसभेसाठी माजी आमदार नारायण (आबा) पाटील जनतेच्या मनातील निर्णय घेणार, करमाळा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
लोकसभा निवडणुकीसाठी माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे जनतेच्या मनातील निर्णय घेतील असे सुचक वक्तव्य पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रथमच पाटील गटाकडून या निवडणुकी विषयी भाष्य केले गेले. यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे जनाधार असलेले नेते आहेत.
७२ हजार मतांचा भक्कम जनाधार असताना गेली साडे चार वर्षे त्यांनी सतत करमाळा विधानसभा मतदार संघातील महत्वाचे प्रश्न मांडले. जनतेसाठी अहोरात्र सक्रिय राहुन माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी जनतेशी आपली असलेली नाळ तुटु दिलेली नाही. करमाळा तालुक्यातील झालेल्या ग्रमामपंचायतीच्या तीनही टप्प्यात पाटील गट आघाडीवर राहीला असुन सन २०१९ नंतरही माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेवरील जनतेचा विश्वास कायम असून जनाधाराचा आलेख हा चढत्या क्रमाने वाढतच राहीला आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील घडामोडीत माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. सन २०२४ ची विधानसभा निवडणुक नजरेसमोर ठेऊन आणि जनतेचा कौल पाहुनच लोकसभेसाठी नारायण (आबा) पाटील हे योग्य ते निर्णय घेतील. राज्य व देशपातळीवर असलेले मोठे नेते माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संपर्क साधुन आहेत. काही पक्ष प्रमुखांनी माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. पण अद्यापही वेट अँड वाॅच हि भुमिका घेऊन सर्व बाजूंनी विचार करुन आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



