महाराष्ट्र

एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून उत्साहात साजरा

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73

आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी करायचं या उद्देशाने काही तरुणांनी मिळून एक वर्षापूर्वी एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्था सुरू केली होती त्या वर्षभरात त्यांनी अनेक उपक्रम राबवले. आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी या संस्थेचा प्रथम वर्धापन दिन होता.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या सभासदांनी एक सामाजिक कार्य म्हणून माळशिरस तालुक्यातील येळीव व वाडी नं 2 येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे लहान मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामध्ये मुलांना लागणाऱ्या वह्या, अंकलिपी, पेन ,पेन्सिल व इतर अनेक गोष्टी होत्या. त्याचबरोबर त्या लहान मुलांना खाऊच्या स्वरूपात बिस्कीट पुडे ही देण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी हर प्रकारे सहकार्य केले. व शाळेतील मुख्याध्यापक श्री. झोडगे बाबासाहेब ,उपशिक्षिका सौ अश्विनी गोरड मॅडम, व सौ.लंबे मॅडम यानी तरुणांच्या कार्याला प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-श्री नागेश जाधव (सर), उपाध्यक्ष- जुबेर मुजावर, सचिव-भाग्यवंत भालेराव खजिनदार -समाधान कसबे,सहसचिव- आकाश शिंदे, सदस्य- प्रवीण कसबे,तसेच सभासद अजय भांडेकर प्रमोद सुतार, पवन गिरी ,ऋषिकेश निंबाळकर, व इतर गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button