महाराष्ट्र

करमाळा शहरात तात्काळ साथीचे रोग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करा अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढू,मा. नगरसेवक फंड यांचा नगरपालिका प्रशासनाला इशारा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान मांडले असून सध्या करमाळा शहराच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे तेव्हा करमाळा नगरपालिकेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशक फवारणी करावी अन्यथा नगरपालिकेवर आम्ही मोर्चा काढू असा इशारा माजी नगरसेवक अतुल फंड यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे

प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की करमाळा शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना या त्रासाला खूप सामोरे जावे लागत आहे या बाबीकडे करमाळा नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे संबंधित नगरपालिकेतील प्रशासकीय यंत्रणेला मी सांगू इच्छितो करमाळा तालुक्यातील दवाखान्यांची परिस्थिती बघितली तर एकही दवाखाना मोकळा दिसत नाही प्रत्येक दवाखाने गच्च झालेत अक्षरशा तिथे उभा राहण्यास जागा नाही एवढे डेंगू चिकनगुनिया मलेरिया थंडी ताप अशा आजारांनी त्रस्त झालेली करमाळ्यातली सर्वसामान्य जनता दिसून येत आहे आणि याचा आर्थिक ताणही सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहेत

करमाळा शहरांमध्ये बऱ्यापैकी गटारी उघड्याच आहेत त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी शहरांमध्ये पसरलेली आहे यावर प्राथमिक उपचार म्हणून प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे त्या तात्काळ करून घ्याव्यात अन्यथा करमाळा शहरातील सर्वांना एकत्रित करून नगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात येईल ही दखल करमाळा नगरपालिका प्रशासनाने घ्यावी मा नगरसेवक अतुल फंड असा इशारा प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी फंड यांनी दिला आहे यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे हेही उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button