महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी उद्या करमाळ्यात होणार,जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंटक अर्थात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या निवडी उद्या दिनांक 29 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी साडेबारा वाजता शासकीय विश्रामगृह करमाळा येथे आयोजित केली असल्याची माहिती इंटकचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल आश्रू जाधव यांनी एका जाहीर पत्रका द्वारे दिली आहे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आयोजित सोलापूर जिल्हा कार्यकारणीची बैठक व पदाधिकाऱ्यांचे निवडी च्या या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर कैलास भाऊ कदम तसेच उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र जगताप तसेच महिला सेल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिताताई गोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे याशिवाय सोलापूर जिल्हा काँग्रेस आयचे अध्यक्ष नंदकुमार पवार तसेच सोलापूर शहर काँग्रेसचे चेतन नरोटे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती अमोल जाधव यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button