पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायत क्षेत्रात लोक सहभागाने केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी यांनी राबवले स्वच्छता अभियान…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात
2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत म्हणून साजरा केला जातो.

या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते.या स्वच्छता मोहिमे अंतर्गत पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायतीच्या वतीने केळवे ग्रामपंचायत क्षेत्रात एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी अभियाना अंतर्गत गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी यांच्या संयोजनातून या अभियानाचा शुभारंभ केळवे शीतलाई देवी मंदिर परिसरातून सुरुवात करण्यात आली .

यावेळी या स्वच्छता अभियानाला उपस्थित सर्व ग्रामस्थांना केळवे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संदीप किणी यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी या अभियानाला केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, अपूर्वा राजेश चौधरी व जिल्हा परिषद व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडी शिक्षिका- शिक्षक वर्ग, हॉटेल असोसिएशन केळवे, ग्रामपंचायत सदस्य,उपसरपंच
व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



