शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनच्या गणरायाचे जल्लोषात विसर्जन…

⛔ पारंपरिक वेशभूषेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी काढली भव्य मिरवणूक… ⛔

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सफाळे पोलिसांनी यंदाही पोलीस स्टेशनमध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली होती. या गणेशाचे विसर्जन सोमवारी सायंकाळी पारंपरिक वेशभूषा आणि ढोलताशाच्या तालात नृत्य करून भव्यदिव्य मिरवणुकीतून झाले.

भारतीय संस्कृतीतील कोणताही सण प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून थोडी उसंत मिळवून साजरा करतोच. मात्र, यात अपवाद ठरतात ते सर्वांचे रक्षणकर्ते पोलीस. दहशवादी कारवायांमुळे सार्वजनिक सणांवर नेहमीच भीतीचे सावट पसरलेले असते. त्यामुळे पोलिसांना नेहमी आपल्या कर्तव्यपूर्तीस उभे राहावे लागते. तरीही वेळात वेळ काढून सफाळे पोलीस स्टेशनमध्ये 10 दिवसाच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.

दरम्यान सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून दहा दिवस गणरायाची यथोचित पूजाअर्चा केली. सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील दीड, अडीच, पाच, सात दिवसांचे सार्वजनिक व खाजगी गणपतींचे विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांनी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर या दहाव्या दिवशी सायंकाळी वाजता पोलीस स्टेशनमधून वाजत गाजत गणरायाची भव्य मिरवणुक काढली.

या मिरवणुकीत प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, अमलदार यांच्यासह महिला व पुरुष पोलीस कर्मचारी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सामील झाले होते. मिरवणुकीत ढोल-ताशाच्या तालावर सर्वच जण मराठमोळ्या वेशात थिरकत होते. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये व पोलिसांना सहकार्य व्हावे यासाठी सफाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बंधू म्हात्रे, जगदीश किणी, महेंद्र पाटील, विलास जाधव, पोलीस पाटील, सर्पमित्र अशा सर्वांनी विशेष खबरदारी घेतली होती. रात्री साधारण साडेनऊ ते दहाच्या सुमारास गेरूचा ओहोळ येथे एकत्रित आरती करून गणेश मूर्तीचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीत सर्व तंटामुक्ती अध्यक्ष, महिला दक्षता कमिटी, जेष्ठ नागरिक, पत्रकार आदी सामील झाले होते.

⛔ सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना आम्हा पोलिसांना नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य दयावे लागते. यातून थोडासा आनंद मिळून कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सहायक पोलीस निरीक्षक दत्ता. के.शेळके,
सफाळे पोलीस स्टेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button