29 सप्टे ला अकलूज येथे रंगणार भव्य राजकीय सोहळा…

⛔ ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसा निमित्त होणार अभिष्टचिंतन सोहळा…
⛔ महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक धुरंदर राहणार उपस्थित :- सुत्रांची माहिती…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज :- महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाविकास आघाडी कडून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सन्मान सोहळा रविवार दि 29/9″24 रोजी दुपारी दोन वाजता अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल च्या भव्य मैदानावर होणार असल्याची माहिती संबंधित सत्कार समिती ने जाहीर केली…
सदर सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा “पद्मविभूषण” शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधिमंडळातील काँगेस पक्षाचे पक्षनेते बाळासाहेब थोरात साहेब असणार असुन “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती हि सत्कार समारंभ समितीने दिली…
या सत्कार समारंभ सोहळ्यासाठी राजकारणातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असुन अकलूज च्या भव्य अशा विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे जवळ जवळ पन्नास हजार नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती हि सत्कार समारंभ समितीने दिली…



