वेळापूर येथील मुस्लिम जनसमुदाया तर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीत सरबत वाटप…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
गेल्या दहा दिवसांपासून सबंध महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठया आनंदाने साजरा करण्यात आला,आज सगळीकडेच गणेश विसर्जनासाठी मिरवणूकाही मोठया प्रमाणात निघाल्या,अशाच प्रकारे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हि गणेश विसर्जनासाठी मिरवणुका निघाल्या असता हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक पहायला मिळाले…
सबंध वेळापूर शहरातील मिरवणुका ज्या मार्गे निघाले होते त्या मार्गावर वेळापूर येथील “आधार” बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि मुस्लिम जनसमुदाया तर्फे थंड गार सरबत ची सोय करण्यात आली होती,अशी माहिती वेळापूर ग्रामपंचायत चे मा उपसरपंच तसेच “आधार” बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे अध्यक्ष जावेद मुलाणी यांनी दिली,ते टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलत होते…
या वेळी सरबत वाटप ची सुरुवात खुदबुद्दिन कोरबू यांच्या हस्ते करण्यात आली,या वेळी वेळापूर पंचक्रोशितील मुस्लिम समाजातील अन्य घटकातील युवक मोठया प्रमाणात सामील होते…
मुस्लिम समाजातील युवकांनी हि गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील होत “गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” अशा मानवंदना देत गणरायास या वर्षीचा अखेरचा निरोप दिला…
वेळापूर येथील मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र येत गणेश विसर्जन मिरवणुकीत सरबत वाटप केल्याने सर्वच समाज घटकातून त्यांचे कौतुक होत आहे,वेळापूर येथील मुस्कान ज्यूस चे मोलाचे सहकार्य लाभले…



