महाराष्ट्र

मुस्लिम समाजाच्या वतीने मानाच्या गणपतींचे स्वागत.पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप, मुस्लिम समाजाने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

करमाळा:-प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय एकात्मतेचे तसेच हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवीत गणेश मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला गणेश मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शेरनी बुंदी वाटप करून एक आगळे वेगळे आदर्श समाजासमोर ठेवले आहे

करमाळा शहरातील सुभाष चौकात श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाची मिरवणूक येताच मुस्लिम समाजाच्या वतीने नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, इंदाज वस्ताद अफरोज पठाण, सोहेल शेख तौफिक शेख, समीर दाऊद शेख, नवाज पठाण ,समीर सिकंदर शेख आदी मुस्लिम समाजातील युवकांनी श्री गणराया चे उत्साहात स्वागत केले यावेळी हजरत महंमद पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व पोलीस उपनिरीक्षक माहुरकर व इतर पोलिस कर्मचारी ,मकाई सहकारी साखर कारखानेचेअध्यक्ष दिनेश भांडवलकर, नगरसेवक सचिन घोलप, सरकार मित्र मंडळाचे अध्यक्ष वांगडे, सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.गेल्या वर्षा पासून हिंदू आणि मुस्लिम समाजाचे दोन्ही सण एकाच वेळी आल्याने मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी पैगंबर जयंती गणेश उत्सवानंतर साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले

नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी हे रुपचंद तालीम गणेश उत्सव मंडळ व जयमहाराष्ट्र गणेश उत्सव मित्र मंडळ या मंडळाची जबाबदारी ते पुर्ण पणे आजपर्यंत सांभाळत असुन हिंदू मुस्लिम समाजात कसा एकोपा राहील यासाठी ते गेली चाळीस वर्षांपासून प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहेत

माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी तसेच त्यांचे बंधू ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी हे गेली कित्येक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून दिवाळीच्या सणामध्ये गोरगरिबांना सणाचे किड्स वाटप तसेच रमजान ईद मध्ये गरीब व गरजू मुस्लिम बांधवांना शीरखुर्माचे साहित्याचे वाटप याशिवाय पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत अन्नदान असे विविध सामाजिक उपक्रम श्री तांबोळी बंधु हे करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button