THE GREAT BEING HUMAN म्हणजेच शिवतेजसिंह मोहिते पाटील…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारीता पण हिच पत्रकारिता जेंव्हा विकली जाते तेंव्हा “सत्य” आपोआप लपले जाते आणि जन्म होतो विपरीत बुद्धी धारकांचा,पत्रकाराने नेहमी सकारात्मक रहावे म्हणजे त्यांच्या डोक्यातून सकारात्मक विचार बाहेर पडतात…
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कसब्याची पोट निवडणुक झाली होती आणि या निवडणुकीत काँग्रेस चे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना उद्देशून भाजपा च्या एका अती शहाण्या मंत्री महोदयांनी “WHO IS DHANGEKAR…?” असे बाशफळ विधान केले होते आणि हे विधान केल्या नंतर काही दिवसांनीच त्या निवडणुकीचा निकाल लागला आणि कसब्याच्या जनतेने “THIS IS DHANGEKAR” म्हणत काँगेस च्या विजयाची नोंद केलेली आपण सर्वांनी पाहिले…
आता प्रश्न पडतो हा विषय इथे कसा…? तर त्याचे झाले असे माढा लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे पेलनाऱ्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा माढा विधानसभा मतदार संघा करीता चालु झाल्यामुळे आणि एका पत्रकाराला हि आता मोहिते पाटील या नावाची ॲलर्जी झाल्यामुळे त्या पत्रकाराने आपल्या विपरीत बुद्धी चे प्रदर्शन करत “कोण हे शिवतेजसिंह मोहीते पाटील” असा प्रश्न केल्यामुळे हा शब्द प्रपंच…

राजकारणात जनता हिच जनार्दन असते हे आपण या लोकसभा निवडणुकीत पाहिले असुन त्या जनतेच्या च मनात असेल की माढा विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार हे शिवतेजसिंह मोहिते पाटील हेच असावेत तर अशा संकुचित वृत्ती च्या लोकांनी आपली विकलेली पत्रकारिता बासनात गुंडाळून ठेवलेली बरी…
आणि जाता जाता शेवटी शिवतेजसिंह मोहिते पाटील हे कोण आहेत ज्यांना ज्यांना माहीत नाही अशांनी अकलूज परिसरात एक फेर फटका मारुन मगच आपल्या अकलेचे तारे तोडावे,ऐन उमेदीत अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच म्हणुन त्यांनी केलेली कामगिरी हि तपासावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मिळवलेले जीवाभावाचे कार्यकर्ते हि…अजुन त्यात भर म्हणजे माढा तालुक्यातील मित्र मंडळी हि आलेच…
काही दिवसांपूर्वीच माढा तालुक्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान झाले होते त्या वेळी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा तालुक्याचा दिवसभर दौरा करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले यात इतके वाईट वाटून घेण्याचा त्या पत्रकाराचा तरी काय संबंध…?
अकलूज आणि परिसरात एखाद्या वेळेस पाऊस
धुमाकूळ घालतोच आणि हो हो म्हणता अकलूज चे नाले तुडुंब भरून वाहू लागतात त्यामुळे नाल्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरते असे होऊ नये म्हणून दुरदृष्ठी असलेले शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज च्या कडेने असलेल्या सर्व नाल्यांची साफसफाई आणि रुंदीकरण केल्याने पावसाळ्यात किती तरी कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे तसेच अकलूज च्या प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे,जुन्या अकलूज मध्ये नवीन नळ पाणीपुरवठा योजना आणि अशा बऱ्याच विकास कामांची नोंद शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मुळे झाली आहे…
माढा विधानसभेच्या उमेदवारी साठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होणे स्वाभाविक आहे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर भविष्यात वातावरण कसे असेल याची काळजी त्या पत्रकाराने आपल्या मालकांजवळ जाऊन करावी म्हणजे झालं…
तुर्तास इतकेच… आणखी भेटूच…



