महाराष्ट्र
“युवक मित्र” वणव्यां मध्ये गारव्या सारखा…!डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले भर पावसात अभिवादन…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीपुर येथे आयोजित कार्यक्रमात “युवक मित्र” शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अचानक वरून राजाचे आगमन झाले आणि “मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा” या गीताची आठवण आली…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करताना “युवक मित्र” शिवतेजसिंह मोहिते पाटील आणि आकाशातून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या सरी ह्या वणव्यातील गारव्यां सारख्याच वाटत होत्या,अवकाळी पावसाने वातावरणातील गारवा आणि उपस्थित सर्व भीम सैनिकांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखे च होते हे मात्र तितकेच खरे…

