सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
माढा लोकसभा मतदार संघाचे महायुती चे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेल्या ऑब्जेशन ला नाट्यमय घडामोडी नंतर निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केराची टोपली दाखवल्याने “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं” या वाक्याची प्रचिती आल्याने मोहिते पाटील समर्थका मध्ये एकच आनंदाचे वातावरण पसरले आहे…
आणि इकडे भाजपा ने खेळलेल्या “रडी” च्या डावाचा फज्जा उडाल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गोटात अस्वस्थेचे वातावरण पसरले असुन आता धैर्यशील मोहिते पाटील हे कशी “बॅटिंग” करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

काल रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणुक अर्जावर शेती,व्यवसाय,नौकरी या गोष्टीचा तपशील न दिल्याने आक्षेप घेतल्या नंतर आज लगेच निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सर्व बाबींची योग्य पूर्तता पडताळून पाहत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जाला क्लीन चीट दिली…