शहर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भव्यसभा विरार विवा कॉलेज येथे संपन्न.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भव्य सभा शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी विरार विवा कॉलेज येथे पार पडली.

या भव्य सभेला पक्षाचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासह पक्षाचे दोन्ही आमदार व माजी खासदार तसेच माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह जिल्हा व तालुक्याचे अध्यक्ष,ऊपाध्यक्ष पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवायची का?” असे विचारताच कार्यकर्त्यांनी ‘हो’ म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा हितेंद्र ठाकूर यांनी नुसतं लोकसभा लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची असा निर्धार बोलवून दाखवला.

यावेळी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यात आपले तीन आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य व सर्वात जास्त ग्रामपंचायत तसेच वसई विरार सारखी मोठी महानगरपालिका यांवर आपल्या पक्षाचे एकहाती वर्चस्व असताना व जवळपास 50 % मतदार हे आपले असल्यामुळे यावेळचा खासदार हा आपल्याच पक्षाचा असणार असा विश्वास व्यक्त केला.तसेच अप्पा देतील तो लोकसभेचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षाच्या कतृत्वाच्या जोरावर आत्मविश्वासाने विजयी करून आणू अशी ग्वाही दिली.

या वेळी या सभेला उपस्थित माजी खासदार बळीराम जाधव, माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष बुकले, माजी नगराध्यक्ष मानकर व पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यां सर्वांनी लोकसभेचा उमेदवार अप्पांनी घोषित करावा आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे अशी ग्वाही दिली.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रतिउत्तर देताना
हितेंद्र अप्पा यांनी देखील एक दोन दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला. युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही. आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवा. जेव्हा जेव्हा आपण कोणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो. आताही आघाडी व युतीने उमेदवार दिलेला आहे. आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी देखील यावेळी या सभेत हितेंद्र ठाकूर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button