अखेर संकेत कांबळे बनला निमगांव (मा) मधील पहिला पोलीस उपनिरीक्षक (PSI)

विशेष प्रतिनिधी,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या वर्ष 2021 च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत निमगांव (माढा) येथील चिरंजीव संकेत अर्जुन कांबळे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करूनही पोलीस क्षेत्राचे गारुड उराशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.मात्र सुरुवातीच्या अनेक प्रयत्नात अपयश पदरी पडले.अनेक वेळा मुलाखत होऊनही थोड्याशा फरकाने निराशा पदरी पडत होती. असे असतानाही डगमगून न जाता पुन्हा नव्या उमेदीने व जिद्दीने परिश्रम करून निमगांव (माढा) येथील ‘पहिला फौजदार’ होण्याचा मान संकेत याने मिळवला आहे.
त्याच्या या यशामागे रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारे त्याचे वडील मुख्याध्यापक श्री अर्जुन कांबळे,आई सौ विजया कांबळे,बंधू संदिप,वहिनी स्नेहा,बहिण सायली आणि दाजी अमित यांनी खंबीरपणे साथ दिली.त्याच्या या यशाबद्दल समस्त कांबळे परिवार,नातेवाइक, समस्त ग्रामस्थ निमगांव (माढा) आणि परिसरातील राजकीय,सामाजिक अशा सर्व स्तरातून अभिनंदन करुन कौतुकाचा वर्षाव होत आहे केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे या उक्ती प्रमाणे संकेत ने जे प्रयत्न आपल्या शिक्षणा नंतर दाखवले त्याच्या याच जिद्दीला टाइम्स 9 सलाम करत आहे…संकेत च्या पुढील कारकिर्दी साठी भरभरून शुभेच्छा…



