शहर

वेळापूर येथे “ईद ए मिलाद” निमित्त भव्य रक्तदान शिबीर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

नवजवान जुलूस कमिटी,वेळापूर यांच्या वतीने “ईद ए मिलाद” निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घघाटन वेळापूर मुस्लिम जमातीचे अध्यक्ष खुदबुद्दीन कोरबू यांच्या हस्ते करण्यात आले…

वेळापूर येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक चळवळीतील “नवजवान जुलूस कमिटी” आणि वेळापूर शहर मुस्लिम जमात यांच्या संयुक्त विद्यमानाने सुन्नी शाही मशीद येथे हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती वेळापूर चे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच जावेदभाई मुलाणी यांनी सांगितले…

या वेळी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिरा वेळी दुपार पर्यंत 50 रक्त दात्यांनी रक्तदान केल्याचे सांगण्यात आले…

या वेळी वेळापूर गाव चे,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,अकलूज चे ॲड वजीर शेख, आर पी आय चे मिलिंद सरतापे,अकलूज चे साजिदभाई सय्यद,छोटा जावेद बागवान यांनी हि रक्तदान स्थळी भेट दिली…

मुस्लिम सुन्नी जमात चे अध्यक्ष खुदबुद्दीन कोरबू,सचिव जावेद मुलाणी,जुलूस कमिटीचे अध्यक्ष सुरज तांबोळी,अमर भाऊसाहेब,सलमान मुलाणि,फारुक भाऊसाहेब,मुस्लिम ऑर्गनायझेशन महाराष्ट्र अध्यक्ष अन्सार मुलाणी,ग्रामपंचायत सदस्य रहीम मुलाणी,यासीन मुलाणी, शाहीद मुलाणी,आलम बागवान,आफताब मुलाणी,मन्सूर शेख,शाहबाज पठाण,वाहीद मुलाणी यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button