शहर

अकलूज येथे “ईद ए मिलाद” निमित्त भव्य रक्तदान शिबीर…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व सहायता वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ईद ए मिलाद” निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घघाटन अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पांडुरंगराव चांगोजीराव देशमुख व अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते करण्यात आला…

अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अकलूज नगरपरिषद सभाग्रह येथे केले असल्याचे मोहसिन शेख यांनी सांगितले

या वेळी अकलूज नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांनी ही रक्तदान करत रक्तदानाचा हक्क बजावला,या वेळी सहायता वेलफेअर फाऊंडेशन उपाध्यक्ष इन्नूस बाबा सय्यद,सहसचिव समीर काझी,सदस्य फारूक शेख,वसिम पटेल,रियाज शेख,इजाज मुजावर,जैद तांबोळी,सुजीत गायकवाड, सुरेश भाऊ गंभीरे, नाजिरहुसेन मोहोळकर,मोहसिन शेख, अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य दादाभाई तांबोळी, साजिदभाई सय्यद,भैय्या माढेकर,छोटा जावेद बागवान,फारुक शेख,समीर काझी, मौलाली मकानदार यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button