महाराष्ट्र

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त करमाळा शहर व तालुक्यात ड्राय डे ची करमाळा तहसीलदारांकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

:दिनांक 16/9/2024 दिवशी पैगंबर जयंती निमित्त करमाळा शहर व तालुक्यात ड्राय डे (दारू विक्री बंद) करणेबाबत सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहर अध्यक्ष जमीर सय्यद यांनी करमाळा तहसीलदार व यांच्याकडे निवेदन दिले आहे.

मोहम्मद पैगंबर यांचे संदेश अखंड मानवजाती साठी उपयुक्त आहे. संपूर्ण जगात व आपल्या भारत देशात मोहम्मद पैगंम्बर व त्यांच्या विचारांना वेगळं अमूल्य स्थान आहे. देशातील सामाजिक क्षेत्रात व रोजच्या सार्वजनिक जीवन जगत असताना त्यांच्या विचारांचा अवलंब केला जातो. त्यांच्या जयंती दिनी विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश करून जयंती साजरी केली जाते.

त्याचप्रमाणे मोहम्मद पैगंम्बर यांनी त्यांच्या विचारात दारू ही हराम केली होती. दारूचे सेवन करू नये असा संदेश त्यांनी दिला. या संदेशाचा मान ठेवत या दृष्टिकोनातून मोहम्मद पैगंम्बर यांच्या जयंतीदिनी आपण ड्राय डे(दारूबंदी) म्हणून घोषित करावा अशा प्रकारची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
यावेळी आझाद शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रमजान बेग सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन, सुरज शेख सचिव रहनुमा ट्रस्ट,सोहेल पठाण राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिशान कबीर, जहाँगीर बेग, आलिम पठाण,शाहीद बेग,इकबाल शेख ,कलंदर शेख, फिरोज बेग, आरबाज बेग, राजु बेग, शाहरुख नालबंद, सुफरान शेख, कलीम शेख, आरीफ पठाण,इरफान सय्यद, अय्यूब मदारी,कय्युम मदारी, अरबाज शेख आदि उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button