शहर

पालघर केळवा सागरी पोलीस ठाण्याच्या पहिल्या डॅशिंग महिला सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यानंतर या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणाऱ्या महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांचे स्वागत आणि शुभेच्छा देताना जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष चेतन पाटील

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील 60 गावातील नागरिकांना पोलीस तक्रार देण्यासाठी एक ते दीड तासाचा प्रवास करून पोलीस तक्रार देण्यासाठी सफाळे पोलीस ठाण्यात जावे लागत होते. या गंभीर बाबीची सफाळे भागातील सर्वपक्षीय राजकीय पुढार्‍यांनी दखल घेऊन पश्चिमेकडील गावांना स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस खात्याकडे केली होती.
या मागणीवरून महाराष्ट्र पोलीस खात्याने 5 मार्च 2013 रोजी केळवा सागरी पोलीस ठाण्याची स्वतंत्र स्थापना केली आहे.

या पोलीस ठाण्याचे पहिले सहायक पोलीस निरीक्षक विकास पाडले यांनी 5 मार्च 2013 रोजी या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्यानंतर या पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ सावंत, सहायक पोलीस निरीक्षक विलास मते, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी अशा अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी जून 2017 पर्यंत पदभार स्वीकारला होता.

यानंतर 08 जून 2017 मध्ये रोजी या पोलिस ठाण्याचा पहिल्या महिला पदभार स्वीकारणाऱ्या डॅशिंग शिस्तप्रिय व कायद्याचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी त्यांच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीत केळवा सुभाष पाडा (बस स्टॉप ) येथील एका वाडीतील हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर बेधडक कारवाई करून हे हॉटेल सीलबंद केले होते. यानंतर दारूबंदी आणि रोड रोमीयोंवर देखील सक्त कडक कारवाया केल्या होत्या .
यानंतर पुन्हा 6 वर्षाच्या कालावधीनंतर सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यासारख्या डॅशिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या व कायद्याची काटेकोरपणे पालन करणाऱ्या तसेच शिस्तप्रिय महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया क्रिशन गोस्वामी यांची नियुक्ती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केळवा सागरी पोलीस ठाणे इन्चार्ज पदी केली आहे.

त्यांनी या केळवा सागरी पोलीस ठाण्याचा पदभार शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 पासून स्वीकारला आहे. यावेळी त्यांचे स्वागत आणि त्यांना शुभेच्छा देताना चेतन पाटील – पालघर जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर उपतालुका अध्यक्ष तसेच विलंगी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, व हर्षद पाटील उपतालुका अध्यक्ष मनसे तसेच विलंगी उपशाखाप्रमुख जयेश घरत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button