करमाळा शहरातील नगरपालिका शाळा येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी तात्काळ नगरपालिकेने निधी उपलब्ध करावा व खाजगी क्लासेस यांना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सक्ती करावी – सकल मुस्लीम समाज करमाळा
करमाळा — प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
बदलापुरात शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले ह्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले महिलावरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात ही विनयभंग बलात्कार अपहरण अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घरातून बाहेर पडलेल्या लेकी बाळी पुन्हा सुरक्षित माघारी येईपर्यंत घरच्यांच तर जीवही कासावीस होत आहे.
अलीकडच्या काळात घडलेल्या काही घटनांमुळे सुसंस्कृतपणाला काहीसा बट्टा लागला आहे. त्यामुळे महिलांच्या इब्रातीला हात घालणाऱ्यांच्या जागीच शिरच्छेद करा असा संताप जनक प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातील गावागावातून उमटत आहेत. महिलांची सलगी करणे, शारीरिक जवळीक किंवा इशारे, शेरे मारणे असे आचरण करणे, लैंगिकता पूर्ण टोमणे मारणे अथवा टिप्पणी करणे, अश्लील गोष्टी दाखवणे, कामाच्या ठिकाणी विशेष सवलत मिळावी म्हणून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आश्वासन अथवा धमकी देणे, मानहानीकारक वागणूक देणे, पदोन्नती रोखण्याची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष धमकी देणे या व अन्य प्रकारचा समावेश लैंगिक छळवणुकीमध्ये आहे.
तालुक्यामध्ये निर्भया पथक आणि पोलीस प्रशासनाने पोलीस टोल फ्री क्रमांकाचे फलक प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये लावण्यात यावे असे आव्हान केले असताना बहुतांश शाळा व कॉलेजने असे फलक लावलेले नाहीत. मुलींना तात्काळ मदत मिळावी यासाठी शाळा कॉलेजच्या आवारात दर्शनी भागात मोबाईल क्रमांकाचे फलक लावले जावेत असे आवाहन केले तरीही अशा प्रकारची तसदी अनेक संस्थांनी घेतलेली नाही खरे तरीही काय प्रचंड खर्चिक गोष्ट नव्हे तरीही मुलींच्या सुरक्षितेबाबत संवेदनशीलता आहे. का दाखवले जात नाही हा गंभीर प्रश्न आहे.
कॅमेरे बसवले अन् बंद ही पडले,,,,,,,,.
तालुक्यातील बहुसंख्य शाळा व महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु त्यातील अनेक बंद अवस्थेत आहेत त्याची दुरुस्तीच केलेली जात नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत त्यामुळे सुरक्षितताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे शो बाजी न करता त्याची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
खाजगी क्लासेस परिसरात कॅमेरे बसवणे गरजेचे,,,,,,,,
खाजगी क्लासेस वाल्यांनी देखील मुलींच्या सुरक्षेचे विषय काळजी घ्यावी. खाजगी क्लासेसला देखील बहुसंख्येने मुली शिकण्यासाठी जात आहेत परंतु क्लासेस वाल्याने देखील या मुलींची काळजी घेणे ही खूप महत्वाची बाब आहे. खाजगी क्लासेस मध्ये तसेच परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रोज काय प्रकार घडतो ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे काही घटना घडत असतील तर त्या समोर आणणे देखील तितक्याच महत्त्वाचे आहे.
तसेच करमाळा शहरातील नगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.यावेळी जमीर भाई सय्यद आझाद भाई शेख रमजान भाई बेग सुरज भाई शेख,दिशान भाई कबीर, अलीम भाई पठाण, शाहीद भाई बेग, कलंदर भाई शेख, इकबाल भाई शेख, कलीम भाई शेख,
करमाळा शहरातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये या ठिकाणी पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम राबविले पाहिजे. तसेच करमाळा शहरातील विद्यालये व काॅलेज परिसरात महिला दामिनी मार्शल पेट्रोलिंग करिता नेमण्यात यावी अशी मागणी नागरिकांनीची आहे
समीर शेख ( मार्गदर्शक भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा )