ॲड. घाडगे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त करमाळ्यात आरोग्य शिबिर संपन्न
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील ज्येष्ठविधीज्ञ व करमाळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्व.ॲड. नानासाहेब घाडगे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इतर अनावश्यक गोष्टींना फाटा देत त्यांचे चिरंजीव डॉ. अमोल घाडगे व स्नुषा डॉ. स्वाती घाडगे यांनी केशव प्रतिष्ठान, शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था, सर्वोदय प्रतिष्ठान व तरटगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने करमाळा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये प्रथम मान्यवरांच्या हस्ते ॲड. घाडगे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली व ॲड. घाडगे यांच्या कार्यावरती प्रकाशझोत टाकण्यात आला, त्यानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक गजानन गुंजकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी करमाळा मेडिकोज गिल्ड व करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, त्यांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांचा सन्मान करण्यात आला.
या आरोग्य शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नामांकित असे बार्शी येथील कॅन्सर तज्ञ डॉ राहुल मांजरे पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ विकास खामकर (बार्शी) , दंत तज्ञ डॉ विजय सिंह तनपुरे यांचे सोबतच श्रवण यंत्र संदर्भातील तपासणी पुणे येथील श्री शुक्ला व श्री सिंग यांनी केली. या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास १८४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ श्रीराम परदेशी, डॉ वसंत पुंडे, डॉ केमकर, डॉ रोहन पाटील,डॉ कविता कांबळे, डॉ वर्षा करंजकर,डॉ पोपट नेटके, डॉ हर्षवर्धन माळवदकर, डॉ अशोक शिंदे, डॉ अशितोष कापले,डॉ विठ्ठल पवार, डॉ कुलकर्णी राजेंद्र घळके, धनराज मोरे, राजकुमार घाडगे, किरण वाळुंजकर, मिलिंद माने, अरविंद घाडगे,अमोल बावडकर, राम घाडगे,मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवरत्न संस्थेचे अध्यक्ष अमरजीत साळुंके यांनी केले, प्रास्ताविक डॉ. अमोल घाडगे यांनी, तर आभार केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव प्रतिष्ठान, सर्वोदय प्रतिष्ठान, शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा चे सदस्य, तरडगाव ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.