गुळसडी येथील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ यांना चेक बाउन्स प्रकरणी सहा महिन्याची करमाळा न्यायालयाने दिली शिक्षा,सात लाख 27 हजार रुपयाचा केला दंड
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख
गुळसडी तालुका करमाळा येथील माजी सरपंच तसेच
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप-सभापती दत्तात्रय रामदास अडसूळ यास चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने शिक्षा आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- चा दंड -उसनवार घेतलेली रक्कम परत देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्याने करमाळा न्यायालयातील खटल्यात न्यायाधीश श्रीमती भार्गवी भोसले यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास ६ महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील कोळगाव येथील दगडु कुंडलिक चेंडगे यांनी दत्तात्रय रामदास अडसूळ यास पाच लाख रुपये हातऊसने दिले होते. सदरची हातऊसणे घेतलेली रक्कम दगडु चेंडगे यांना परत देण्यासाठी दत्तात्रय अडसूळ यांनी दगडु चेंडगे यांना दिलेला धनादेश न वटल्याने दगडु चेंडगे यांनी ॲड जयदिप देवकर यांच्या मार्फत करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
त्याची सुनावणी न्यायाधीश भार्गवी भोसले यांच्या समोर होऊन न्यायाधीश यांनी सदर धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास अडसूळ यास दोषी धरुन सहा महिने तुरुंगवास आणि रक्कम रुपये ७,२७,१६६/- च्या दंडाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी दगडु चेंडगे यांच्याकडून ॲड जयदिप देवकर यांनी तर आरोपी दत्तात्रय अडसूळ कडून ॲड बी.आर.राऊत यांनी काम पाहिले.