महागांव तालुक्यातील सरपंच संघटना व सामान्य शेतकऱ्यांची धाव मंत्रालयाकडे

यवतमाळ प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव.
महागाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी संतधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या अनेक कुटुंबांच्या घरात पाणी गेले व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 300 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पिके व जमिनीचे अतोनात नुकसान झाले काही जमिनी 4 ते 5 फूट खरडून गेल्या माती गाळ वाहून त्या ठिकाणी वाळू जमा झाली शेतकऱ्यांच्या शेतातील अवजारे पाईप ,ड्रीप, मोटार पंप ,वाहून गेले विहिरींची पडझड झाली बोरवेल गाळले अनेक नाल्यांचे अति पावसामुळे दिशा बदलल्या या परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांनी पाहणी केली

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ज्यामध्ये गुंज, शिरपूर, चिलगव्हाण, करंजी, माळेगाव ,खडका ,लेवा ,कौरवाडी, अंबोडा, वाघनाथ, हिवरा ,धनोडा, दहिसावळी, पोंडुळ ,वाकान ,कोणदरी, तीव्रंग, आनंदनगर ,थार ,कासारबेल ,वरोडी, टेंभी ,काळी, राहूर, करंजखेड ,हिंगणी, धारमोहा, राजुरा, या ग्रामपंचायतीने ठराव घेऊन मंत्रालयात धाव घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनर्विकास मंत्री अनिल पाटील, विभागाचे आमदार नामदेवरावजी ससाने साहेब, यांच्या समवेत चर्चा झाली यावेळी उपस्थित सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकणे प्रगतशील शेतकरी (अमृत पॅटर्न) हनुमंतराव देशमुख, दिनेश देशमुख, डॉक्टर संदीप शिंदे, सरपंच विकास जाधव ,दिनेश रावते ,संतोष कोरके ,दिगंबर राजने, प्रमोद जाधव, दत्तराव कदम ,गोविंदराव देशमुख, अमृतराव देशमुख, इत्यादी सरपंच व शेतकरी यांनी निवेदन दिले



