महाराष्ट्र

बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने करमाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा संपन्न.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दिं. 17/6/2023 रोजी,पंचायत समिती सभाग्रह करमाळा येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता,
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले,

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिलाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांनी केले, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत साहेब, यशकल्याणी सेवा भवन संस्थापक अध्यक्ष मा. गणेश भाऊ करे पाटील, करमाळा पोलीस ठाण्यातील मा. साने साहेब, अॅड. बाबुरावजी हिरडे साहेब,बहुजन मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष अकबर शिकलकर ,बालविकास प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका आतकर मॅडम, अंगणवाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष मा. माळी गुरुजी व सौ. माळी मॅडम, तसेच उपस्थित प्रशालेतील सर्व मुख्याध्यापक, यांचा सन्मान करण्यात आला,

त्यानंतर तालुक्यातील 11 विद्यालयातून 35 गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक यांचा सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र , व फुल देवुन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यां व पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन मराठी पत्रकार संघातील पदाधिकारी सौ. आशाताई चांदणे जिल्हा महिलाध्यक्षा , प्रमिला जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षा, श्री. बाळासाहेब भिसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, श्री. आबासाहेब झिंजाडे जिल्हा सचिव, श्री. प्रमोद खराडे तालुका अध्यक्ष, श्री. संभाजी शिंदे तालुका कार्याध्यक्ष, श्री. प्रदिप पवार तालुका सचिव,श्री. संजय चांदणे सदस्य, श्री. सचिन नवले सदस्य, श्री. श्रीमंत दिवटे सदस्य. तसेच बहुजन मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा टिम, व शिक्षक बांधव, पालक, मातापालक, व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक, गायक, श्री. सचिन नवले यांनी केले, कार्यक्रमाच्या शेवटी सुंदर, सुरेख असी एक कविता म्हणण्यात आली दु:ख आडवायला उंबर्यासारखा… मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा… अशा या कवितेने कार्यक्रम अतिशय सुंदर सुरेख, उत्कृष्ट पध्दतीने संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button