सांगली येथील गोरगरिबांचा मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या हत्येमुळे एकच खळबळ

उपसंपादक–—– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. .97 30 867 448
राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणुन ओळखले जाणणारे” नालसाहब मुल्लाह” यांची निर्घृण हत्या केल्याने आज मृत्यू स्वस्त …आणि जीवन हे महाग झाले आहे असे म्हंटले तर “अतिशियोक्ती” ठरणार नाही. कारण..काही क्षणापुर्वी हसत -खेळत” असणारा “माणूस” काही वेळानंतर मृत्युमुखी पडलेला असतो..
सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण सांगलीत “खळबळ” उडाली आहे.
2 जुळ्या मुली , पत्नी आणि आईला एकटे सोडून नालसाब आज अनंतात विलीन झाले आहेत .
माणूस “मरतो” ,परंतु त्याच्या “पश्चात” त्याच्या कार्याची शिदोरी उघडली जाते .
दररोज 250 लोकांना मोफत उच्च प्रतीचे जेवण, प्रभागातील किमान 10 विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला 2000 रुपये , प्रत्येक आठवड्याला “गरीब” लोकांना जीवनावश्यक वस्तूचे. किट , त्याबरोबरच प्रत्येक घरात “आठवड्याला” मटण , तसेच कारागृहात असणाऱ्या कुटुंबियांना -मुलांना प्रत्येक महिन्याला रोख रक्कम , दिवाळी – ईद या पवित्र सणाचे “औचित्य” साधून प्रत्येक कुटुंबियांना रोख रक्कम -दीपावली किट – रमजान किट वाटप असे एक ना अनेक दानधर्माचे उपक्रम नालसाब मुल्ला यांनी हाती घेतले होते .
प्रसिद्धीपासून अलिप्त राहून , गोरगरिबांसाठी मसीहा होऊन , त्यांच्यासाठी ढालीप्रमाणे उभा राहून “समाजकार्य” करण्याचे काम नालसाब यांनी “प्रामाणिकपणे” केले आहे .
घरगुती भांडण” असो अथवा कोणतीही समस्या असो ,नालसाब हे कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यातून “मार्ग” काढत असत.राष्ट्रवादी. काँग्रेस पार्टी चे नेते आमदार .जयंत पाटील यांचे “खंदे समर्थक” -हितचिंतक म्हणून तें परिचित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपला “ठसा” सांगली मध्ये उमटविला होता.
पत्त्याच्या घराप्रमाणे “एका क्षणात” “घरातील” कर्ता पुरुषाचा मृत्यू “मन” हेलावणारा असतो .एका क्षणात ज्याचे कुटुंब उध्वस्त होते,त्या कुटुंबाला त्या कर्त्ता पुरुषाची “किंमत” विचारा , पोरके झालेल्या त्या लहान मुलींना वडिलांची ‘किंमत” विचारा , जिचे. कुंकू पुसले गेले आहे त्या पत्नीला विचारा ..त्याच्या पतीची “किंमत” काय आहे ???
राष्ट्रवादीचे नेते .जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँगेस पार्टी ,सर्व *नेते – कार्यकर्ते. नालसाब यांच्या “कुटुंबियांच्या” मागे समर्थपणे उभे राहतील यात “तिळमात्र” शंका नाही .गोरगरिबांचे मसीहा सामाजिक कार्यकर्ते नालसाब मुल्ला यांना परमेश्वर स्वर्गप्राप्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

आ .इकबाल मुल्ला ( पत्रकार)
संपादक – सांगली वेध ,
संपादक – वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल – 8983587160



