सफाळे कांद्रेभुरे बेलपाडा येथील 38 वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील सफाळे कांद्रेभुरे बेलपाडा येथील 38 वर्षीय इसमाचा रेल्वे अपघात होऊन त्याचा उपचारादरम्यान गुजरात राज्यातील वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे.
सफाळे कांद्रेभुरे बेलपाडा गावातील अनंत तुकाराम भोईर वय वर्ष 38 हा इसम सोमवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता सफाळे रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे जाणाऱ्या वलसाड गाडीने विरार येथे वेस्टन डीएफसीसी आयएल प्रोजेक्ट सीपीटी 11 जेएनपीटी वैतरणा एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कन्सरट्रुम या कंपनीत कामावर जाण्यासाठी प्रवास करत असताना

विरार नारंगी फाट्याजवळ त्याचा या गाडीतून तोल जाऊन तो खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला छातीला आणि हाताला जबरी मार लागला होता म्हणून त्याला रेल्वे पोलिसांनी प्रथम उपचारासाठी नालासोपारा आचोले येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते परंतु त्याला जबरी दुखापत झाल्यामुळे येथील डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी पुढे पाठवले असताना त्याचा उपचारादरम्यान गुजरात राज्यातील वलसाड येथील सिविल हॉस्पिटल मध्ये मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी मृत्यू झाला आहे.




