बेंद ओढ्याचे पुनर्जीवन नारायण (आबा) पाटील यांच्या हातूनच होणार – सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी . अलीम शेख मोबाइल नंबर 9850686360
विकास निधीवर पहिला अधिकार छत्तीस गावांचा राहणार असून बेंद ओढ्याचे पुनर्जीवन नारायण (आबा) पाटील यांच्या हातूनच होणार असल्याची खात्री प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केली.
244 करमाळा विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना मिळणारा वाढता जनाधार व सद्यस्थिती यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले कि सत्ता परिवर्तनची खरी सुरुवात ही करमाळा मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातूनच झाली असून गावाभेट दोऱ्याचे वेळेस अनेक मतदारांनी याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. वास्तविक पाहता या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अगदी नागरी सुविधे पासून याची सुरुवात होते.
बेंद ओढ्याचे पुनर्जीवन होणे ही या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब असून जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्यानेच हे काम कित्येक वर्षे अपूर्ण राहिले. विद्यमान आमदारांच्या निष्क्रियतेचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला. सीना माढा जोड कालव्याचा फायदा हा केवळ ठराविक गावाना मिळवून द्यायचा ही संकुचित वृत्ती शिंदे बंधूनी ठेवली व यामुळेच या मोठ्या योजनेचा पूर्ण लाभ माढा तालुक्याला मिळाला नाही.
अनेक वर्षे रखडलेली विकासकामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करून दाखवणे ही नारायण आबा पाटील यांची खासियत आहे. यामुळे आमदार झाल्यावर दहिगाव उपसा सिंचन योजने प्रमाणेच बेंद ओढ्याच्या कामालाही प्राधान्य देऊन कायमस्वरूपी सिंचनानाचा हा प्रश्न नारायण आबा पाटील सोडवतील अशी खात्री तळेकर यांनी बोलून दाखवली. तसेच या भागातील रस्ते, आरोग्य, सिंचन, वीज, शिक्षण व रोजगार निर्मिती या कामांचा समावेश असलेला कुर्डुवाडी शहरासह छत्तीस गावाचा नियोजित विकास आराखडा महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांचेकडे असल्याचे तळेकर यांनी आवर्जून सांगितले.



