शहर

माळीनगर येथील पीर पठाण शाह बाबा यांचा उरूस भक्ती भावाने साजरा

माळीनगर प्रतिनिधी… रियाज मुलाणी 9921500780

माळीनगर येथील पीर पठाण शाह बाबा यांचा उरूस माळीनगर– सवतगाव मुस्लिम समाज व या उरूसाचे आयोजक जाफरभाई सय्यद यांच्या वतीने साजरा करण्यात आला या उरुस निमित्त दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी सात वाजता माळीनगर येथील मशिदीतून संदलची मिरवणुक काढण्यात आली त्यानंतर ही मिरवणूक पठाण बाबा यांच्या दर्ग्यावर आल्यानंतर समाधीला संदल चढवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला

दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या उरूसा निमित्त माळीनगर सवतगाव मुस्लिम समाज व या उरुसाचे आयोजक जाफरभाई सय्यद यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा माळीनगर- सवतगाव लुमेवाडी परिसरातील हिंदु मुस्लिम भाविकांनी लाभ घेतला तसेच 19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता जियारत चा कार्यक्रम संपन्न झाला

या उरुस निमित्त दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे व होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, यांच्या हस्ते पीर पठाण बाबांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करुन दर्शन घेतले. हा उरुसचा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्याकरिता या उरुसचे आयोजक जाफरभाई सय्यद यानी आर्थिक सहाय्य केले

तसेच या उरुसा करिता आयोजकासह माळीनगर सवतगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शमशुद्दीन शेख,उपाध्यक्ष जब्बार तांबोळी, सचिव सलीम शेख, लायक सय्यद,व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले

या प्रसंगी व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक शिरीषभाई फडे, माळीनगरचे माजी सरपंच अभिमान जगताप, मा उपसरपंच संग्राम भोसले, सचिन दळवी,शंकरराव गायकवाड , ज्येष्ठ पत्रकार हुसेनभाई मुलाणी, रमजान इनामदार,आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button