अकलुज येथे आ .रणजितसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी शंकर नगर विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट शंकर नगर शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न नॉलेज सिटी शंकरनगर येथे दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ए एन जी सॉफ्टवेअर पुणे, कॅलरटेक पुणे, इनपासेंट पुणे कोड एन जी टेक्नोमाईंड पुणे, बियाणी टेक्नॉलॉजी कोल्हापूर मध्ये , प्रो एरर सॉफ्टवेअर पुणे, एम जे ऑटोमेशन अँड सॉफ्टवेअर सोल्युशन मध्ये , कोडीट्रॉन टेक्नॉलॉजी पुणे , किरण अकॅडमी, टीमलीज सर्विसेस पुणे या कंपन्यांकडून डेव्हलपर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी यासाठी बीसीए, एमसीए, एमएससी कॉम्प्युटर, बी इ कॉम्प्युटर या पत्रताधारक अर्ज करू शकतात.
बँकिंग क्षेत्रामध्ये आयसीआयसीआय बँक मध्ये रिलेशनशिप मॅनेजर यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. भारतीय स्टेट बँकेत ऑफिसर्स पदासाठी भरती होणार आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आय टी आय डिप्लोमा डिग्री मेकॅनिकल ऑटोमोबाईल पात्रता धारक उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत. आयकॉन सेस टेक विजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्हची भरती होणार आहे.
शिवामृत उत्पादक सहकारी संघामध्ये ज्युनियर अकाउंटंट क्लार्क, सेल्स एक्झिक्युटव्ह, टेक्निकल ऑफिसर, केमिस्ट, एम एस्सी केमिस्ट्री हे पात्रता धारक अर्ज करू शकणार आहेत, प्लांट सुपरवायझर वायरमन पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.

इक्वीटीज स्माॅल फायनान्स बँक,हिमाचल फुटूरीस्टीक कम्युनिकेशन लि.जस्टडायल लिमिटेड, मार्केटींग विभागात बियाणी टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे भरती होणार आहे. आश्विनी हॉस्पिटल अकलूज मध्ये स्टाफ नर्स, विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज मध्ये असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर अँड क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदासाठी जागा उपलब्ध आहेत.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मध्ये नॉन टेक्निकल ट्रेनर मेंटर पदासाठी श्री आनंदी गणेश ट्रस्ट मध्ये क्लर्क अटेंडंट पदासाठी संधी उपलब्ध होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात खाजगी व सहकारी अशा एकूण 25 कंपन्यांमध्ये 500 पेक्षा अधिक जगावर भरती करण्यात येणार आहे. याचा लाभ अधिकाधिक युवक युवतीने घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



