अकलुज येथील स.मा.वि.विद्यालय प्राथमिक विभागात स्व.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची जयंती साजरी.

उपसंपादक हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेत आज राजमाता स्व.रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील तथा आक्कासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला समितीच्या सदस्या सौ.कुलकर्णी उपस्थित होत्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रशाला समितीच्या सदस्या .मनीषा चव्हाण ,.स्नेहल नरुळे तसेच सौ.चैताली शेंडगे ,सौ.कथले ,सौ.गुळवे उपस्थित होत्या.तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम उपस्थित होत्या.

तसेच राजमाता आक्कासाहेबांच्या वेशभूषेत आलेली विद्यार्थिनी कु.सोनिया गुळवे उपस्थित होती.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनी कु.स्वरा गायकवाड व संगीत विभागाने राजमाता आक्कासाहेब यांच्या जीवनावर आधारित “माता भगिनी वहिनी” हे “रत्नाई गीत” सादर केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षक किर्दक सर यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित सन्माननीय अतिथींचा सन्मान प्रशालेच्या मुख्याध्यापिका .शेख मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच प्रशालेतील विद्यार्थी चि.सोहम उरवणे व कु.तेजस्विनी राऊत हिने आपल्या भाषणातून आक्कासाहेबांच्या कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले. आणि प्रशालेतील शिक्षिका .स्वामी मॅडम यांनी आपल्या विचारातून आक्कासाहेबांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

यावेळी आज प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा व स्थानिक प्रशाला समितीच्या सभापती . स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख पाहुणे,विद्यार्थी शिक्षक-शिक्षिका सर्वांनी दिदीसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि प्रशालेत आज वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी वर्गाची सुंदर अशी सजावट केली होती.या वर्ग सजावट स्पर्धेचे परीक्षण .कुलकर्णी .नरूळे , .मनीषा चव्हाण . कथले वहिनी,.चैताली शेंडगे यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .प्रदीप मिसाळ सर यांनी केले. तर शेख मॕडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.



