महाराष्ट्र

पालघरच्या जनता दरबारा मध्ये डहाणू ते वैतरणा रेल्वे समस्या बाबतडहाणू वैतरना सेवाभावी संस्थेच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार डॉ. हेमंत सवरा यांना निवेदन सादर..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारा मध्ये डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडण्यात आल्या आणि या बाबतच्या निवेदनाची प्रत पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सावरा यांना देण्यात आली .

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून कोविड काळात बंद झालेल्या सर्व गाड्या पुन्हा सुरू कराव्यात व प्रत्येकी 30 ते 45 मिनिटात एक गाडी चालवावी. तसेच पूर्वीच्या सौराष्ट्र एक्सप्रेस च्यावेळेत लोकल सुरू करावी, वैतरणा ते डहाणू दरम्यान एकही स्थानकात रेल्वे प्रवाशांच्या (महिला व दैनंदिन प्रवासी) सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्यांची बऱ्याच वर्षांची मागणी आहे. या कामासाठी साहित्य येऊन सुद्धा काम पूर्ण केले नाही.तसेच केळवेरोड सफाळे येथील अनुक्रमे ROB व भुयारीमार्ग लवकरात लवकर बांधून पूर्ण करावा व पालघर-वसई-कल्याण दरम्यानच्या उपनगरीय लोकल फेऱ्या वाढवण्यात याव्या अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी या जनता दरबारामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण,पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित,पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, व पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील विभाग प्रमुख यांच्यासह पालघर जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button