महाराष्ट्र

सुसंस्कृत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भरत बनसोडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त

बी टी शिवशरण

श्रीपूर येथील आंबेडकरी चळवळीतील एक सुसंस्कृत वैचारिक सांस्कृतिक अभ्यासू कार्यकर्ते भरत बनसोडे यांना जाऊन एक वर्ष होत आहे त्यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार १६जुलै रोजी श्रीपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी बारा वाजता पुण्यानुमोदन कार्यक्रम आहे भरत बनसोडे हे एक संमजस मनमिळाऊ बोलक्या स्वभावाचे लोकप्रिय व्यक्तीमत्व होते त्यांचा श्रीपूर पंचक्रोशीतील अनेक जातीधर्माच्या व्यक्तींबरोबर ऋणानुबंध होता त्यांच्या कडे. परिसरातील अनेक आठवणी माहितीचा भरपूर खजिना असायचा

ते एखादा प्रसंग घटना हुबेहूब कथन करत श्रीपूर कसे वसले शाळा कशी बांधली जुने अधिकारी जुने शिक्षक परिसरातील नेते कार्यकर्ते यांच्या कामाची तसेच त्यांची कलात्मक विचारसरणी कामाचे स्वरुप या बाबतीत ते जागरूक होते त्यां आठवणी माहिती ते युवा पिढीला व विद्यमान परिस्थितीत सर्वांना आपल्या सहज सोप्या भाषेत पटवून व सहज सांगत त्यांना ड्राय इंग ची आवड होती ते उत्कृष्ट व्हालीबाल खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या संघाला बक्षीस मिळऊन दिली आहेत

तसेच ते उत्तम क्यारम खेळत त्यांना साहित्य वाचनाची खुप आवड होती ते दलित पँथरचे श्रीपूरचे अध्यक्ष असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात माळशिरस तालुक्यातील खेडेगावात शहरात मराठवाडा विदयापिठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी सभा मिटिंग मोर्चा आंदोलन घेऊन लोकजागृती केली श्रीपूर ते माळशिरस सायकलवर त्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मोर्चा काढला होता ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे स्वरुप बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जयंती निमित्त बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी निबंध स्पर्धा क्रिडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा व्हालीबाल स्पर्धा मिरवणूक बक्षीस वितरण समारंभ गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्रित बोलाऊन सामाजिक विकासाच्या मुद्यावर चर्चा कार्यक्रम घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला

त्यांना खेळाची आवड असल्याने त्यांनी बी आर ए. म्हणजे भिमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने व्हॉलीबॉल संघ काढला होता सदर संघ उत्कृष्ट कामगिरी करुन अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली अनेक विषयांवर त्यांच्यावर लिहण्यासारखे खूप आहे त्यांचा नेहमी हसरा चेहरा बोलका विनोदी स्वभाव होता ते बोलण्यात अनेक मिस्किल कोट्या करून समोरच्याला खळाळून हसवत ते कधीच कोणावर रागावत नसतं कधी कोणाला दुखावत नसतं ते श्री चंद्रशेखर विद्यालयात लेखनीक म्हणून सेवेत होते आंबेडकरी चळवळीतील तसेच रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते यांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध होते ते उत्तम भाषण देत त्यांचं हस्ताक्षर खुप सुंदर होते

त्यांनी शाळेत नोकरी करण्या पुर्वी दि बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट ली श्रीपूर यांनी कारखान्यात काटा विभागांत व टाईम किपर विभाग मध्ये काम केले तसेच सुरवातीला श्रीपूर ग्राहक मंडळ मध्ये लेखनिक म्हणून काहीकाळ काम केले आहे ‌

भरत बनसोडे यांनी आपली जिवनाची सुरुवात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केली अनेक अडचणींवर मात करत वाटचाल सुरू केली ते कठीण प्रसंगी कधी डगमगले नाहीत त्यांनी अडचणींमुळे धीर सोडला नाही आपलं कुटुंब त्यांनी स्थीर स्थावर केलं मुलांना शिक्षीत केलं आपल्या मुलींना सुस्थितीत विवाह करून दिले मुलांचीही लग्न केली आता कुठं सुखासमाधानाने जगण्याचे नातवंडांना खेळण्याचे आनंदी दिवस आले असताना कृर नियतीनं त्यांना त्यांच्या सुखी समाधानी कुटुंबातुन अचानक भरल्या ताटावरुन नेले हे दुःख इतर कोणावरही येऊ नये भरतं बनसोडेमला सिनियर नेतृत्व होते त्यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मी व माझ्या परिवारातर्फे अंतःकरण पुर्वक विनम्र अभिवादन करतो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button