विशेष

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विक्रमगड मध्ये साजरी

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. भीमराव (बाबासाहेब) आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमतेविरोधात लढा दिला. त्यांची देशभरात जयंती साजरी केली जात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ञ, विचारवंत डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू (आंबेडकर नगर) येथे झाला. ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात संत रोहिदास नगरात उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी विक्रमगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक माननीय श्री.रवींद्र पारखे साहेब, पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री.सतीश जगताप साहेब, पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री. ढुस साहेब, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते श्री.रत्नाकर भालेराव , संत रोहिदास समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री.संजय भोईर, श्री.सुनील अहिरे , श्री.भालचंद्र मोरघा, श्री.दत्तात्रय भोईर, श्री.भगवान भोईर, श्री.विनायक वाघचौरे, श्री. वसंत वाघचौरे, श्री.नंदकुमार वाघचौरे, श्री.राहुल दादा मोरे,श्री.अनिल झिने, सर्व समाज बांधव व महिला वर्ग सर्व संत रोहिदास नगरामधील नागरिक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button