विजय दादा म्हणजे अस्सल सोनं… जयंत पाटील…
आमीर मोहोळकर
अकलूज शहर प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अभुतपुर्व गर्दी मध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करत 43 माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार होण्याचा मान मिळवला, या वेळी माढा लोकसभा मतदार संघातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वर स्तुती सुमने उधळली…
विजय दादा हे अस्सल सोनं असुन सोन्याची पारख हि सोनारालाच असते,असे जयंत पाटील म्हणताच “शिवरत्न” वर हजर असणाऱ्या हजारों कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला…
सभेच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातुन आलेल्या मोहिते पाटील समर्थकांची भाषणे झाली,या मध्ये प्रामुख्याने म्हसवड च्या कविता म्हेत्रे,टेंभुर्णी चे संजय कोकाटे,अरण चे हरिदास रणदिवे,मोडनिंब चे शिवाजी कांबळे,पंढरपूर चे अभिजित पाटील यांच्या सह प्रदेश युवक अध्यक्ष महेबुब भाई शेख यांनी अक्षरशः सभा गाजविली…
शेवटी जयंत पाटील यांनी कधी महायुती सरकारला चिमटे काढत तर कधी मोदी सरकारच्या योजनेचे पोलखोल करत सभेला चार चांद लावले…
अकलूज च्या शिवरत्न वर आज जनतेने अक्षरशः तोबा गर्दी केली होती,कार्यकर्त्यांनी गजबजून गेलेल्या वातावरणात धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित जनतेला साक्षी ठेवत आणि तुतारी च्या निनादात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला…
या वेळी कार्यकर्त्या मध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता…